जम्मूतील व्यंकटेश्वर स्वामी मंदिर ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ची भावना अधिक दृढ करेल : पंतप्रधान

नवी दिल्ली, 9 जून (हिं.स.) : जम्मू इथले श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिर, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची भावना अधिक दृढ करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या ट्वीट थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केले, “हे आपल्या

नील अर्थव्यवस्था आणि अवकाश अर्थव्यवस्थेसारख्या नव्या संकल्पना देशात रुजवल्या – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 8 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात, नील अर्थव्यवस्था आणि अवकाश अर्थव्यवस्थेसारख्या नव्या संकल्पना देशात रुजवल्या आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.” मोदी सरकारची नऊ वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित एक

वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा क्षेत्र सज्ज – प्रल्हाद जोशी

नवी दिल्ली, 06 जून (हिं.स.) : पावसाळ्याच्या मोसमात देखील देशामध्ये कोळशाची टंचाई जाणवणार नाही अशी ग्वाही केंद्रीय कोळसा, खाण तसेच संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. वेगाने विकसित होणाऱ्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कोळशाची देशांतर्गत वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आपले कोळसा क्षेत्र पूर्णपणे सज्ज

हवामान संरक्षणासाठी प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे जाऊन विचार करावा – पंतप्रधान

नवी दिल्ली, 5 जून (हिं.स.) : जागतिक पातळीवर हवामान रक्षणासाठी जगातील प्रत्येक देशाने निहित स्वार्थापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. ते पुढे

समृद्ध कृषी क्षेत्रासाठी आज तंत्रज्ञान क्रांतीची प्रतीक्षा – डॉ जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 3 जून (हिं.स.) : नवोदित स्टार्टअप उद्योजकांनी माहिती तंत्रज्ञान, संगणक आणि दूरसंचार क्षेत्राच्या पलीकडे जाऊन आजवर ज्याबाबत कधीही विचार झाला नाही अशा आणि ज्याला हरित क्रांतीनंतरही आज तंत्रज्ञान क्रांतीची प्रतीक्षा आहे, अशा समृद्ध कृषी क्षेत्रांचाही विचार करावा, असे आवाहन केंद्रीय विज्ञान

पाऊस, पूरस्थितीत केंद्र-राज्य संस्थांमधील समन्वय बळकट करावेत – केंद्रीय गृहमंत्री

नवी दिल्ली, 3 जून (हिं.स.) : पूर व्यवस्थापनात आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि केंद्रीय जल आयोगाद्वारे सध्या दिला जाणारा 5 दिवसांचा पाऊस/पूराचा अंदाज आगामी पावसाळ्यापर्यंत 7 दिवसांपर्यंत वाढवला जाईल. देशातील प्रमुख पाणलोट क्षेत्र/परिसरामध्ये पूर आणि पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या अंदाजाकरिता

राजनाथ सिंग यांची 5-6 जून रोजी नवी दिल्लीत अमेरिका, जर्मनीच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली, 3 जून (हिं.स.) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन आणि जर्मनीचे संरक्षण फेडरल मंत्री बोरीस पिस्टोरियस भारताच्या भेटीवर येत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे अमेरिकचे संरक्षण मंत्री ऑस्टीन यांना 5 जून रोजी

भारत पुनरुत्थान करणारी शक्ती – राजनाथ सिंह

नवी दिल्ली, 2 जून (हिं.स.) : भारत ही उदयोन्मुख नव्हे तर पुनरुत्थान करणारी शक्ती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक आर्थिक नकाशावर देश आपले स्थान पुन्हा प्राप्त करत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. 17 व्या शतकापर्यंत

देशवासियांचे उत्तम आरोग्य, समृद्धी, कल्याणासाठी पंतप्रधानांची भगवान ब्रह्माकडे प्रार्थना

नवी दिल्ली, 1 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पुष्कर मंदिरात पूजा केली आणि नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. पंतप्रधानांनी ट्विट केले, “पुष्करमध्ये भगवान ब्रह्माजींच्या मंदिरात पुजा आणि दिव्य दर्शनाचे भाग्य प्राप्त झाले. देशवासियांचे उत्तम आरोग्य , समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली.”

नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशवासियांना सज्ज होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली, 1 जून (हिं.स.) : 21 जून रोजी असलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आठवण करून दिली आहे. या दिनासाठी आपण सज्ज होऊया, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य वाढवणारी ही प्राचीन परंपरा साजरी करूया, असे आवाहन मोदी यांनी केले