काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुध्द सुशीलकुमार शिंदे गट आक्रमक
सोलापूर, 4 जून, (हिं.स) सोलापुरात ज्यांना कोणी विचारत नाही त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या केबीनमध्ये घेऊन बसतात. यापुढील काळात असे होऊ नये, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांसमाेर केली. सोलापूरचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार शिंदे यांच्याकडे असावा, असेही नरोटे म्हणाले.