कुटुंबातील एक सदस्य अशी छाप उमटविणारी व्यक्ती काळाने हिरावून नेली – बावनकुळे
मुंबई, 4 जून (हिं.स.) सुलोचनादीदी म्हणजे कुटुंबातीलच एक सदस्य अशी छाप मराठी मनावर उमटविणारी व्यक्ती! आजच्या सायंकाळी हे नाते काळाने हिरावून नेले. आई, बहीण, वहिनी, आत्या, मामी, मावशी अशी अनेक कौटुंबिक नाती त्यांनी अभिनयाच्या जोरावर केवळ पडद्यावरच साकारली नाही, तर घराघरात निर्माण केली.