गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे – रवींद्र चव्हाण

मुंबई, 8 जून (हिं.स.) : जनतेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अधिक व्यापक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशाच पद्धतीने गुणवत्तापूर्ण कामाला सर्वांनी प्राधान्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा मंत्री रवींद्र

छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक : राज्यपाल

मुंबई, 6 जून, (हिं.स.) लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे महानायक होते. परकीय शक्तींकडून असलेले धोके ओळखून त्यांनी सुरतेवर आक्रमण केले. शिवाजी महाराज आणखी २० वर्षे जगले असते तर भारताचा इतिहास पूर्ण वेगळा राहिला असता, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज

दिव्यात मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा

ठाणे, 6 जून, (हिं.स.) : ठाणे शहराबरोबर वेगाने वाढणाऱ्या दिवा शहरातील नागरिकांनाही ठाणेकरांसारख्या सेवा- सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी दिवा शहरावर विशेष प्रेम असणारे स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने दिवा शहर व परिसरात होणाऱ्या विविध विकास कामाचा लोकार्पण व भुमिपूजन सोहळा बुधवार

अजित पवार यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊँ माँसाहेब, संभाजीराजेंना वंदन

मुंबई, ६ जून, (हिं.स) – शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन… राजमाता जिजाऊं माँसाहेबांना वंदन… स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना वंदन… स्वराज्यस्थापनेत महाराजांना साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना वंदन करत सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार

सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

ठाणे, ६ जून, (हिं. स) : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे 1500 हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे.

सूक्ष्म, लघु ,मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र सचिव नेमण्यास राज्य सरकारची मान्यता – नारायण राणे

मुंबई, 5 जून (हिं.स.) : राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असल्याची माहिती केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते

सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत – अजित पवार

मुंबई, 4 जून (हिं.स.) रुपेरी पडद्यावरच्या सहजसुंदर अभिनयानं सिनेरसिकांना आई, बहिण, वहिनीच्या नात्याचं ममत्व देणाऱ्या सुलोचना दीदींच्या निधनानं भारतीय सिनेसृष्टीतील समृद्ध युगाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री, महाराष्ट्रभूषण सुलोचना यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन

सुलोचना दीदींच्या निधनाने सिनेसृष्टीसह महाराष्ट्राची मोठी हानी – मुनगंटीवार

मुंबई, 4 जून (हिं.स.) : पद्मश्री तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित सिने सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर (दीदी) यांच्या निधनाने सिने सृष्टीतील ज्येष्ठ आणि मृदू स्वभावी नामवंत अभिनेत्री गमावल्याचे दुखः आहे, अशी शोक संवेदना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

सुलोचना दीदी यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी – विनोद तावडे

मुंबई, 4 जून (हिं.स.) सुलोचना दीदी म्हणजे सांस्कृतिक महाराष्ट्राचा सालस चेहरा. त्यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी साकारलेल्या सोज्वळ भूमिका सर्वांनाच आपल्या घरातील थोरामोठ्यांच्या मायेची आठवण करून देतात. त्यांच्या दर्जेदार अभिनयासाठी त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’, ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह – नाना पटोले

मुंबई, 3 जून (हिं.स.) केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. ९ वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे