पेशव्यांच्या नाविक साम्राज्याचे भक्कम प्रतीक | अर्नाळा किल्ला | Forts of India
जंजिरे अर्नाळा : उत्तर कोकणातील बेलाग जलदुर्गांच्या बळकट फळीत जंजिरे अर्नाळा किल्ल्याचे विलक्षण महत्व आहे. १६ व्या शतकात पोर्तुगिजांनी तयार केलेल्या नकाशावर अर्नाळा बेटावर फक्त एकच टेहळणी बुरुज उभारलेला स्पष्ट दिसतो. नरवीर चिमणाजी आप्पा पंडित यांच्या नेतृत्वाखाली उत्तर कोकणातील रणसंग्रामात मराठी सैन्याने पहिले