जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

नाशिक : जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध
हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे प्रकरण
नाशिक, 20 मार्च (हिं.स.) : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नेते ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सनातन हिंदू धर्माविषयी केलेल्या अक्षेपार्ह विधानाचा निषेध करत भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्या वतीने रविवार कारंजा येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
यावेळी भाजयुमोचे शहराध्यक्ष अमित घुगे यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड हे आपल्या मतदार संघातील विशिष्ठ समुदायाला खुश करण्यासाठी व त्यांचे लांगुल चालन करण्यासाठी जाणीवपुर्वक सतत हिंदु धर्माविषयी व महा पुरुषांविषयी चुकीचे व आक्षेपार्ह विधान करत असतात हिंदु नववर्ष गुडीपाडवा महाराष्ट्रात साजरा होण्यासाठी तयारी सुरु असताना आव्हाड विधानसभेत तसेच माध्यमांशी बोलतांना सतत अवमानकारक वक्तव्य करत आहेत. यावेळी त्यांनी हिंदु धर्माविषयी विधान करून महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण होईल अशी कृती केली आहे. भाजपा युवा मोर्चा या घटनेचा तीव्र निषेध करत असून त्यांनी माफी मागावी अन्यथा आगामी काळात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल. रविवार कारंजावर झालेल्या आंदोलनाप्रसंगी भाजयुमो शहराध्यक्ष अमित घुगे, सरचिटणीस निखिलेश गांगुर्डे, सागर शेलार, प्रशांत वाघ, सागर परदेशी, विजय गायखे, आदित्य केळकर, मुफद्दर पेंटर, विक्रांत गांगुर्डे, हर्षद जाधव, ऋषिकेश डापसे, पवन उगले, पियुष तोडकर, पवन केंदळे, पवन गुरव, हर्षद वाघ, विपुल सुराणा आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार