December 9, 2023
अर्थकारण आणि आर्थिक घडामोडी

नील अर्थव्यवस्था आणि अवकाश अर्थव्यवस्थेसारख्या नव्या संकल्पना देशात रुजवल्या – डॉ. जितेंद्र सिंह

नील अर्थव्यवस्था आणि अवकाश अर्थव्यवस्थेसारख्या नव्या संकल्पना देशात रुजवल्या – डॉ. जितेंद्र सिंह

नवी दिल्ली, 8 जून (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात, नील अर्थव्यवस्था आणि अवकाश अर्थव्यवस्थेसारख्या नव्या संकल्पना देशात रुजवल्या आहेत, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.” मोदी सरकारची नऊ वर्षे साजरी करण्यासाठी आयोजित एक महिन्याच्या “व्यापार संमेलना”त ते बोलत होते.

अर्थव्यवस्थेकडे बघण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनामुळे,आज अर्थव्यवस्थेचे सध्याचे स्तंभ अधिक बळकट झाले आहेत, असे डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या अर्थव्यवस्थेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ चोरी किंवा गैरव्यवहारांवर आला घातला. त्याचवेळी, टाळता येण्यासारखे निर्बंध आणि अनुपालनाचा भार कमी करून अर्थव्यवस्थेच्या स्तंभांना बळकट केले. पूर्वीच्या सरकारांनी ज्याकडे फारसे लक्ष दिले नाही, अशा छोट्या मात्र महत्वाच्या सुधारणा त्यांनी व्यवसाय सुलभतेसाठी अमलात आणल्या, असेही ते म्हणाले.

आपल्या देशाचा अंतराळ विकास प्रवास अमेरिका आणि रशिया या देशांच्या कितीतरी उशिरा सुरु झाला असला, तरीही आज हे देश आपल्या देशातील इस्रोने विकसित केलेले तंत्रज्ञान त्यांचे उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी वापरत आहेत, ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असेही जितेंद्र सिंह म्हणाले.

आतापर्यंत भारतातून सोडले गेलेल्या एकूण 385 उपग्रहांपैकी, 353 परदेशी उपग्रह, गेल्या नऊ वर्षात अवकाशात सोडले गेले. त्यातून 174 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स तर युरोपीय उपग्रह प्रक्षेपणातून, 86 दशलक्ष युरो इतकी कमाई झाली. भारताने सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून इंग्लंडला मागे टाकले असतानाच, त्यांचे उपग्रह प्रक्षेपित करून महसूलही मिळवला आहे. नील अर्थव्यवस्थेशी संबधित खोल समुद्रातील अभियानाबद्दल पंतप्रधानांनी आपल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख करत, समुद्रात लपलेल्या ह्या खजिन्याविषयी जनजागृती केली. व्यावसायिक समुदायाने व्यवसायाच्या नवीन संस्कृतीशी जुळवून घेण्याचे आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

योगी यांची BJP, मोदी यांची BJP आणि पुण्यातली BJP यांच्यात काही ताळमेळच नाही लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट आहे! Love Jihad is an International Conspiracy! ब्रिटिशांच्या सैन्या मध्ये सर्व जातीचे लोक होते, कोरेगांव भीमा च्या स्तंभावर मेलेल्यांची नावे आहेत दाऊद,छोटा शकील, हाजी मस्तान, करीम लाला असे स्मगलर अफजलच्या कबरीवर जमायचे – मिलिंद एकबोटे अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम तोडले, हे आमच्या आंदोलनाचे यश!
योगी यांची BJP, मोदी यांची BJP आणि पुण्यातली BJP यांच्यात काही ताळमेळच नाही लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट आहे! Love Jihad is an International Conspiracy!