नगर शहरात खा.संजय राऊत यांच्या प्रतिमेला मारले जोडे

अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) – शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर पत्रकार परिषदेत विचारले गेलेल्या प्रश्नावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बाजूला थुंकल्याच्या निषेधार्थ शहरात दिल्लीगेट वेस समोर शिवसे नेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारुन, त्यांची प्रतिमा पायाखाली तुडविण्यात आली.
अनिल शिंदे म्हणाले की,राजकारणातील मूर्खपणाचा कळस म्हणजे संजय राऊत यांची प्रतिमा आहे.नेहमीच वादग्रस्त विधान व कृत्य करुन प्रसिध्दी झोतात येण्याचे काम ते करत आहे. या प्रकाराला यापुढे दुर्लक्ष केले जाणार नसून, जशास तसे उत्तर दिले जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात राऊत यांना फिरु देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.दिलीप सातपुते म्हणाले की, राजकारणातील गलिच्छवृत्तीचा प्रकाराचे दर्शन संजय राऊत यांच्या कडून घडत आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचे काम त्यांनी केले. सकाळी उठल्याबरोबर वेगळे पदार्थ खात असल्याने ते बरळत असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबुशेठ टायरवाले म्हणाले की, राजकारणात व महाराष्ट्रात संजय राऊत यांना किंमत नाही. कोणी विचारत नसल्याने वादग्रस्त करून वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष वेधण्याचे काम ते करत असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार