December 8, 2023
पायाभूत सुविधा आणि विकास कामे

महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे – संग्राम जगताप

महाराष्ट्राच्या जडणघडणीत लाल परीचे योगदान खूप मोठे – संग्राम जगताप

अहमदनगर, 4 जून, (हिं.स.) :- महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची 75 वर्ष अहोरात्र सुरू असलेली सेवा सुवर्ण अक्षरांमध्ये लिहून ठेवण्यासारखी आहे पहिली एसटी बस सेवा नगर ते पुणे या मार्गावर धावली आहेमहाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लाल परीचा सिंहाचा वाटा आहे. प्रवाशांचा सुखकर प्रवासाच्या माध्यमातून विश्वास संपादन केला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्याचे काम लाल परीने केले आहे. एसटी महामंडळाने नुसती प्रवाशाची सेवा केली नसून रोजगार निर्मिती व राज्याच्या आर्थिक उन्नतीसाठी मदत झाली आहे.कोरोनाच्या महाभयंकर संकट काळातून कर्मचाऱ्यां च्या मेहनतीच्या जोरावर बाहेर पडले आहे. एसटी महामंडळाने लालपरी च्या माध्यमा तून समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिले आहे त्या माध्यमातून ग्रामीण भाग दळणवळणासाठी एकमेका ला जोडला गेला आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लाल परीचे योगदान मोठे आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

तारकपूर एसटी डेपो येथे महामंडळाचा 75 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रस्ताविकात मुकुंद नगराळे म्हणाले,एक जून १९४८ रोजी पहिली बस अहमदनगर ते पुणे या महामार्गावर धावली.एसटी च्या सेवेस 75 वर्ष झाली आहेत.

विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ म्हणाल्या,राज्याच्या जडणघडणीत लालपरीचे योगदान सर्वमान्य आहे.प्रशासकिय सेवेतील अनेक सनदी अधिकारी,आजचे अनेक लोकप्रतिनिधी,उद्योजक,व्यवसायिक यांच्या विद्यार्थीदशेत एसटीचे योगदान राहिले आहे.त्याची आठवण तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्यासह विद्यमान जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आवर्जून व्यक्त करतात. एसटीने अनेकांना प्रगतीसाठी सहकार्य केले प्रवाशांच्या सेवे साठी अनेक संकटावर मात करीत एसटी धावत आहे. आगामी काळात नागरिक सर्व कर्मचारी संघटनां चे प्रतिनिधी कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नातून अहमदनगर विभाग यशस्वी वाटचाल करील.अधिकाराबरोबरच सर्वांनी कर्तव्याची जाणीव ठेवावी नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसण्यात प्रवास करावा असे आवाहन मनीषा सपकाळ यांनी केले.प्रवासी संघटनेचे विजयकुमार झंवर, वांबोरी प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी एडवोकेट अभय मुथा यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील,आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते नगरहून पुण्यासाठी मार्गस्थ होणाऱ्या इलेक्ट्रिक शिवाई बसचे विधिवत पूजन करण्यात आले.या कार्यक्रमात पंचवीस वर्ष विना अपघात सेवा करणाऱ्या अहमदनगर विभागा तील सहा चालकांचा संपत्ती सत्कार टाळ्यांच्या गजरात करण्यात आला. तसेच कोविड काळात दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या एसटी सेवकाच्या वारस पत्नीला अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीपत्र देखील देण्यात आले.शहरातील बस स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांनी केलेल्या दखलपात्र कामगिरीमुळे त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.कामगार अधिकारी बाळासाहेब एकसिंगे यांनी आभार व्यक्त केले.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

योगी यांची BJP, मोदी यांची BJP आणि पुण्यातली BJP यांच्यात काही ताळमेळच नाही लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट आहे! Love Jihad is an International Conspiracy! ब्रिटिशांच्या सैन्या मध्ये सर्व जातीचे लोक होते, कोरेगांव भीमा च्या स्तंभावर मेलेल्यांची नावे आहेत दाऊद,छोटा शकील, हाजी मस्तान, करीम लाला असे स्मगलर अफजलच्या कबरीवर जमायचे – मिलिंद एकबोटे अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम तोडले, हे आमच्या आंदोलनाचे यश!
योगी यांची BJP, मोदी यांची BJP आणि पुण्यातली BJP यांच्यात काही ताळमेळच नाही लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट आहे! Love Jihad is an International Conspiracy!