December 9, 2023
आंदोलने

संजय राऊतांविरोधात शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

संजय राऊतांविरोधात शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन

अमरावती, 3 जून (हिं.स.) :शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शनिवारी राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’आंदोलन करण्यात आले. राऊत यांचे मानिसक आरोग्य ठिकाणावर नसल्याने ते बेताल वक्तव्य व कृती करत असल्याची टिका करत, राऊत यांचा प्रतिकात्मक फोटो असलेल्या पोस्टरला चपला मारुन त्यांचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नांवर थू म्हणत थुंकण्यसाची कृती करत प्रतीक्रीया दिली होती. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा राज्यभरात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून ‘जोडे मारो’ आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अमरावतीमध्येही राजकमल चौकात शिंदे गटाने आंदोलन करत राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन पोस्टवरील राऊत यांच्या फोटोला जोडे मारुन पोस्टर फाडण्यात आले.

यावेळी आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष अरुण पडोळे, निशांत हरणे, शिवसेना महानगर प्रमुख संतोष बद्रे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण दिधाते, शिवसेना शहर प्रमुख आशिष ठाकरे, कामगार सेनेचे वेदांत ताल्हन, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अरुणा इंगोले, वृंदाताई मुक्तेवार, प्रीती साहु, सीमा ढोले, रश्मी डहाणे, नंदा वाघमारे, नितेश शर्मा, पुरुषोत्तम बनसोड, मुकेश उसरे, संजय देवकर, मनोज पांडे, राजेंद्र देवडा, राजेश घोटे, गुणवंत हरणे, विलास चांद, शुभम परळीकर,शुभम शिंदे, चंदु आठवले, शेख मुजम्मील अंसारी, प्रथमेश बोबडे, गोपाल जाधव, विक्की लसनकर, अमित मेश्राम, आकाश खडसे, सुरज बर्डे, सुरज बहद्दुरकर, अखिल ठाकरे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

योगी यांची BJP, मोदी यांची BJP आणि पुण्यातली BJP यांच्यात काही ताळमेळच नाही लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट आहे! Love Jihad is an International Conspiracy! ब्रिटिशांच्या सैन्या मध्ये सर्व जातीचे लोक होते, कोरेगांव भीमा च्या स्तंभावर मेलेल्यांची नावे आहेत दाऊद,छोटा शकील, हाजी मस्तान, करीम लाला असे स्मगलर अफजलच्या कबरीवर जमायचे – मिलिंद एकबोटे अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम तोडले, हे आमच्या आंदोलनाचे यश!
योगी यांची BJP, मोदी यांची BJP आणि पुण्यातली BJP यांच्यात काही ताळमेळच नाही लव्ह जिहाद हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कट आहे! Love Jihad is an International Conspiracy!